“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

206 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर आपला हक्क सांगितला असून शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे . असे आज सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज मोठा दिवस आहे. 16 आमदारांचे भवितव्य, शिवसेनेवर हक्क अशा मोठ्या प्रश्नांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनवाई सुरू आहे. दोन्ही पक्षाचे वकील जोरदार युक्तिवाद करून शिवसेनेवरील आपला हक्क सांगत आहेत.

दरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी आपल्या युक्तीवादामध्ये शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भातच अंतरीम याचिका आम्ही दाखल केली होती, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. विधिमंडळात जरी अपात्र झाले असले तरी पक्षाच सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आम्ही ठरवू ओरिजनल पक्ष कोणता आहे. अध्यक्ष यांचे अधिकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ओरिजनल पक्ष कोणता हे निवडणूक आयोगाच ठरवणार असा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील दातार यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!