SPECIAL REPORT : ‘शिवसेना’ नाव नक्की कुणी दिलं? प्रबोधनकार ठाकरे की प्र.के.अत्रे

488 0

सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना या चार अक्षरी नावाची जोरदार चर्चा सुरूयं मात्र तुम्हाला माहिती आहे का शिवसेना हे नाव नक्की कुणी दिलंय… याच विषयावरील TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट शिवसेना नाव नक्की कुणी दिलं? प्रबोधनकार ठाकरे की प्र.के. अत्रे… 

शिवसेना तर आचार्य अत्रेंची संकल्पना होती. पुढे बाळासाहेबांनी तशी संघटना काढली. आणि त्याला शिवसेना अस नाव दिलं पण मुळ कल्पना तर आचार्य अत्रे यांचीच. शिवसेना स्थापन होण्याचा 7 वर्ष अगोदर म्हणजे रविवार 19 जुलै 1959 रोजी आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राला हांक: शिवसेना उभारा ! आचार्य अत्रे यांनी मराठा मध्ये अग्रलेख लिहला होता.याच अंकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आचार्य अत्रे यांनी एक संघटना उभा करण्याची संकल्पना मांडली होती.

पुढे आचार्य अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर ‘शिवसेना’ हेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले आणि विचार पक्का होताच संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. 19 जून 1966मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली.

त्यामुळं मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याची आचार्य अत्रे यांचं स्वप्न पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण केलं असंच या निमित्तानं म्हणता येईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!