चेन्नई : चेन्नईमध्ये एक मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी हे दांपत्य गेले होते. पण त्या विवाहित तरुणीचा तोल गेल्याने ती अचानक थेट खाली कोसळली या तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चेन्नईच्या तिरुमुल्लैवोयलमध्ये ही घटना घडली आहे. अबिरामी असे या मृत महिलेचं नाव असून घरामध्ये एक कार्यक्रम होता. यासाठी कुटुंबीय जमा झाले होते. यावेळी अबिरामी आणि तिचा पती प्रवीण कुमार हे जेवण झाल्यानंतर टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी अबिरामी हिच्या हातामध्ये मोबाईल होता. टेरेसच्या भिंतीवर बसत असताना तिचा तोल गेला आणि ती थेट खाली पडली.
खाली पडल्यानंतर एका शेडवर आदळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिचा पती प्रवीण कुमार यांनी कुटुंबीयांना तातडीने माहिती दिल्यानंतर सर्वांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
हा घातपात आहे की घातपात याविषयी शहानिशा करताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार हा पत्नी पडतेवेळी तिच्यापासून दूर होता त्यामुळे त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न करूनही तो यशस्वी झाला नसता किंवा त्याने तिला धक्का देण्याचा देखील संशय इथे व्यक्त केला जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेमध्ये अबिरामी या 25 वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे.