“आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही…!” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

627 0

पुणे : कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचे वाटप सुरू आहे. असा आरोप करून रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन केलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटला आहे की, आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू मात्र पैसे वाटणार नाही. तसेच कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चिंचवड मतदार संघ पोटनिवडणुक : भाजप आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर नाही तर आरोप मतदारांवर आहे की मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठलाही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही.

कसबा आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात दोन्हीही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त, आतापर्यंत काय झाले ?

भारतीय जनता पक्षांन पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत हे माहीत पडल्यानंतर असा रडीचा डाव सुरू आहे. कसबामध्ये आचारसंहितेचा खुलं उल्लंघन करण्यात येत आहे. अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide