WhatsApp Features : 2022 मध्ये व्हॉटसअपने आणलेले इंटरेस्टिंग फीचर्स

309 0

भारतात कोट्यवधी लोकं स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोन युजर्सचे पसंतीचे अँप म्हणजे व्हॉटसअप. व्हॉटसअप कंपनीही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. 2022 मध्ये कंपनीने कोणकोणते खास फीचर्स आणले ते पाहूयात..

1.मेसेज रिऍक्शन –
मेसेज रिऍक्शनसाठी व्हॉटसअपने इमोजी रिऍक्शनचे नवीन फीचर आणल आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या मेसेजवर वेगवेगळी प्रतिक्रिया देऊ शकतात.

2. अवतार फीचर
या फीचरचा आधी फेसबुक आणि इतर मेसेजिंग अँपवर वापर केला जात होता. आता व्हॉटसअपच्या अवतार फीचर्सच्या मदतीने युजर्स आपली अवतार डिझाइन करुन त्याला मित्रांना शेअर करू शकतात. याला आपण व्हॉटसअप DP वरही लावू शकतो. चॅटिंग करत असताना तुम्ही अवतार स्टिकर मध्ये बदलून पाठवू सुद्धा शकता.

3. मेसेज UNDO करण्याची सुविधा
व्हॉटसअपने डिलीट फॉर मी ऑप्शनसाठी undo बटनला जारी केलं आहे. या फीचरच्या मदतीने चुकून घाईघाईत डिलीट झालेले मेसेज परत आणता येऊ शकतात.

4. स्वतःला मेसेज करण्याचा ऑप्शन
हे फीचर वापरून आपण स्वतःला मेसेज करू शकतो. व्हॉटसअपवरील कॉन्टॅक्ट मध्ये पहिला नंबर आपला दिसतो. त्यावर क्लिक करून आपण स्वतःशी चॅट करू शकतो, महत्त्वाच्या नोट्स सेव्ह करू शकतो.

5. कम्युनिटी फीचर
याचा वापर करून एकावेळी वेगवेगळ्या ग्रुप्समधील व्यक्तींना मेसेज पाठवणं शक्य आहे. यासाठी आधी व्हॉटसअपवर कम्युनिटी तयार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींना एकावेळी मेसेज पाठवता येतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!