नवतरुणांना होतंय तरी काय ? बॉयफ्रेंडचा बर्थडे धुमधडाक्यात सेलिब्रेट करण्यासाठी अल्पवयीन तरुणीने स्वतःच्याच घरातील दागिन्यांवर मारला डल्ला

777 0

ठाणे : आज-काल नवतरुण प्रेमात पडतात आणि प्रेमात वाहवातही जातात. अनर्थ तेव्हा होतो जेव्हा या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी हे नवतरुण काहीतरी विचित्र पाऊल उचलतात. ठाण्यातल्या या नवतरुणीने देखील असेच एक विचित्र कृत्य केले आहे. आणि आपले विचित्र कृत्य झाकण्यासाठी तिने तिच्या दुसऱ्या अल्पवयीन मित्रावर मोठा आरोप देखील केला होता.

तर घडले असे की, ठाण्यात राहणा-या या नवतरुणीला तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसासाठी काहीतरी खास करायचं होतं. तिच्या बॉयफ्रेंडचा आणि तिचा स्वतःचा वाढदिवस एकाच दिवशी येत असल्यामुळे हा दिवस विशेष सेलिब्रेट करण्यासाठी तिने थेट स्वतःच्याच घरातील दागिन्यांवर डल्ला मारला. तिच्या बॉयफ्रेंडने देखील तिला साथ दिली. हे दागिने विकले आणि त्यातून आलेल्या 53 हजारातून या दोघांनीही मस्त वाढदिवस सेलिब्रेट केला.

पण दागिने चोरीला गेले आहेत ही गोष्ट घरात कळाल्यानंतर या मुलीची भांबेरी उडाली. त्यानंतर तिने हे दागिने चोरल्याचं कबूल केलं. पण विनाकारण तिच्या दुसऱ्या अल्पवयीन मित्राला या प्रकरणात वेगळ्याच पद्धतीने अडकवलं. तिचा मित्र तिचे अश्लील फोटो घेऊन तिला ब्लॅकमेल करत होता. आणि त्यालाच पैसे देण्यासाठी म्हणून तिने दागिने चोरले असे या मुलीने सांगितलं मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आलं. आणि पोलिसांनी तपासा अंती शेवटी मुलीला ताब्यात घेतलं. बीचारा तिचा अल्पवयीन मित्र विनाकारण या प्रकरणात अडकवला गेला होता. आता या मुलीची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. तर चोरीचे दागिने माहीत असूनही विकत घेणाऱ्या ज्वेलर्सला देखील अटक करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!