हा काय प्रकार ? एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका; दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधून सहप्रवाशास घेतले ताब्यात

520 0

बंगळुरू : 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात एक विक्षिप्त प्रकार घडला. फ्लाईटमध्ये आपल्या सहप्रवाशावर एका व्यक्तीने मध्यधुंद अवस्थेत लघुशंका केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

संबंधित सहप्रवाशाला दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विशेष म्हणजे शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे एक हॉटेल आहे. तर शंकर मिश्रा हा स्वतः कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चाप्टर कंपनीचा उपाध्यक्ष आहे.

शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोने त्याला कामावरून देखील काढून टाकलं आहे.

या घटनेनंतर महिनेन शंकरला माफ केलं होतं. शंकर न कपडे धुवून पाठवून दिल्याचं तसेच नुकसान भरपाई म्हणून 15000 रुपये देण्यात आहेत. तसेच ही रक्कम महिलेच्या मुलीने परत केली. विमान कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून या महिलेने तक्रार केली आहे. अशी माहिती शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!