‘दृश्यम 2’ : अजय देवगन या अभिनेत्याच्या दृश्यम या चित्रपटाने 2015 मध्ये धुमाकूळ घातला होता. थ्रिलर सस्पेन्सने परिपूर्ण असा हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीवर खीळवून ठेवण्यास पूर्णपणे यशस्वी ठरला होता. दोन ऑक्टोबरला नक्की काय झालं होतं हा या चित्रपटातील प्रश्न आज देखील अनेक जण चांगलाच लक्षात ठेवून आहेत.
हा चित्रपट साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता. पहिला भाग प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर निर्मात्यांनी याचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आणि सध्या दृश्यम २ चा टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तर मग पाहूयात हा टिझर …
या चित्रपटामध्ये अजय देवगन सोबत तब्बू ,श्रिया सरण ,इशिता दत्ता हे प्रमुख भूमिकेत होते . तब्बूने साकारलेला मीरा देशमुख हा तिचा रोल देखील चांगलाच गाजला. आईजी मीरा देशमुखचा मुलगा अचानक गायब होतो.
स्वतः आयजीचाच मुलगा अशा प्रकारे गायब झाल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा झपाटल्यासारखी त्याचा शोध घेऊ लागते. आणि चौथी पास असणारा विजय साळगावकर या संपूर्ण गुंत्यातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला कसे लांब ठेवतो ,असा हा चित्रपट आहे. पण आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या टिझरमध्ये अजय देवगन कन्फेशन देताना दिसतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.