धुळ्यातील मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून माय लेकराचं मृत्यू

366 0

धुळे- धुळ्यातील मोरशेवडी येथे एका दुर्दैवी घटनेत माय लेकराचा मृत्यू झाला आहे. विहिरीचा भाग कोसळून दोघे ठार झाले. शेतातील विहीर बघण्यासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली.

सुनीता पवार, वय 36 आणि शाम पवार, वय 10 असे मृत झालेल्या मायलेकांची नावे आहेत. दोघे नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून नुकतेच ते मोरशेवडी येथे नातेवाईकाकडे आले होते. दिलीप खीरा जाधव यांच्या विहिरीचे काम शेतात चालू होते. विहिरीचे काम पाहण्यासाठी आलेले असताना अचानक विहिरीचा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली दोघेही दबले गेले.

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!