फेसशिल्ड घालून चंद्रकांतदादा जत्रेत ! शाईफेक हल्ल्यापासून बचावासाठी लढवली अनोखी शक्कल !

278 0

पिंपरी चिंचवड : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर पुन्हा शाईफेक हल्ला होऊ नये म्हणून अनोखी युक्ती लढवल्याचं पाहायला मिळालं. पवना थडी जत्रेच्या उद्घाटनासाठी चंद्रकांतदादा चक्क फेस शिल्ड घालून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले.

 अधिक वाचा : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची पवनाथडी यात्रेला भेट; समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक-पालकमंत्री

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं पिंपरी-चिंचवडमध्ये दहा डिसेंबर रोजी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा चंद्रकांत पाटील पवना थडी जत्रेच्या उद्घाटनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता विकास लोले यानं पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्याची धमकी दिली होती. त्यामुळं खबरदारी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरी देखील आपल्यावर कुणी शाई फेकून हल्ला करू नये म्हणून चंद्रकांत पाटलांनी आपल्या चेहऱ्यावर फेस शील्ड परिधान केली होती.

अधिक वाचा : ‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Share This News
error: Content is protected !!