शिवसेनेची परंपरा आम्ही जोपासतोय, आमचा दसरा मेळावा होणारच; आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य

249 0

बुलढाणा  : आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण आमचा दसरा मेळावा हा होणारच. शिवसेनेची परंपरा आम्ही जोपासत आहोत त्यामुळं आम्ही मेळावा घेणारच, अशी प्रतिक्रिया बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला. आता त्यांच्याकडं काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सेना राहिलीये. भाजप-सेनेची जी युती बाळासाहेबांनी घडवून आणली होती ती आमची सेना आहे, असंही आमदार संजय गायकवाड म्हणाले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला

Share This News
error: Content is protected !!