पुणे गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

395 0

पुणे : गुरुवारी वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गांधी भवन पाण्याच्या टाकीचे त्यासह चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीला स्लो मीटर बसवण्यात येते आहे. त्यामुळे येत्या बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी रात्रीपर्यंत शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याची नागरिकांनी नोंद घ्यावी. यामध्ये कोथरूड,बावधन,वारजे,कर्वेनगर,बाणेर,बालेवाडी,पाषाण,सुतारवाडी तसेच औंधच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे तर शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे

Share This News
error: Content is protected !!