राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील उद्याचा पाणीपुरवठा बंदचा निर्णय रद्द

353 0

पुणे- उद्या म्हणजे गुरुवारी पुणे महापालिकेकडून शहरातील वडगाव आणि भामा आसखेड जलकेंद्र वगळता इतर सर्व शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पाणी बंद चा हा निर्णय मागे घेण्यात आला असून शहराचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. याबाबतची माहिती पाणीपुरवठा प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद एका दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असल्याने पाणीपुरवठा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी महापालिकेचे पर्वती, एसएनडीटी लष्कर, चतुःशृंगी तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र बंद ठेवण्यात येणार होते. मात्र आता ही सर्व केंद्र सुरु ठेवण्यात येणार असून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार आहे.

Share This News
error: Content is protected !!