दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार ! झूम कॉलच्या माध्यमातून बोर्डाच्या परीक्षांवर वॉच !

632 0

दहावी बारावी विद्यार्थ्यांचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केल आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून राज्यातील 9 हजार केंद्रांवर मोबाइल कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून उत्तरपत्रिका संकलित करेपर्यंत परीक्षकांच्या मोबाइलमध्ये त्याचं शुटींग केलं जाणार आहे.

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. खासगी शाळा महाविद्यालयांच्या अनेक तुकड्या पटसंख्ये अभावी बंद कराव्या लागल्या आहेत. भविष्यात आपल्या शाळा महाविद्यालयामधील पटसंख्या कमी होऊ नये म्हणून काही परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्या जातात, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.

या पार्श्वभूमीवर गैरप्रकार थांबवण्यासाठी पहिल्यांदाच पुणे बोर्डाने नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ हजार केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हे खर्चिक असल्यानं सध्या परीक्षकांच्या मोबाइलवर झूम कॉल करून परीक्षा हॉलमधील 3 तासांच शूटिंग केलं जाणार आहे. दरम्यान नागरिकांकडून देखील त्यासंदर्भात सूचना, त्यांचे उपाय मागवले असून 26 जानेवारीपूर्वी त्यासंबंधी अंतिम निर्णय होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!