धो.. धो पावसाने पुणेकरांची तारांबळ ; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सिलिंग कोसळले ; रस्त्यांवर पाणीच पाणी, झाडपडीच्या अनेक घटना

645 0

पुणे : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार कोसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .

दरम्यान आज दुपारनंतर पुण्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि काही वेळातच पुण्यातील रस्ते जलमय झाले . रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत सुरू आहे.

दरम्यान जे एम रोड, शिवणे, नाना पेठ अशा अनेक प्रमुख भागांमध्ये रस्त्यांवरून अक्षरशा: नद्या वाहू लागल्या आहेत. तर कल्याणी नगर ,शिवाजीनगर ,जिल्हा न्यायालय ,रास्ता पेठ या भागांमध्ये झाडपडीच्या घटनांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . धानोरी भागामध्ये गारा पडल्याचे देखील नागरिकांनी म्हटले आहे.

दरम्यान जोरदार पावसासह वादळी वाऱ्यांमुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग देखील कोसळला आहे. हा सिलिंग अचानक कोसळल्यामुळे शासकीय गाड्यांच देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे.

या घटनेमध्ये गाड्यांचे नुकसान झाले असून, कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नसल्याचे समजते.

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याकारणाने नागरिकांनी अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!