चालताना धक्का लागला म्हणून भर रस्त्यात राडा; किरकोळ कारणातून आयुष्य झालं उध्वस्त !

12240 0

उल्हासनगर : रस्त्यावरून चालत जात असताना दारूच्या नशेत धक्का लागल्याने भर रस्त्यात दोघाजणांमध्ये वाद पेटला. हा वाद एवढा विकोपाला गेला की यातील एकाने थेट लाडकडी दांडक्याने घाव घालून दुसऱ्याची हत्या केली आहे. यामध्ये अजय चव्हाण या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील फॉलोवर लेन परिसरात गुरुवारी रात्री निरंजन यादव आणि अजय चव्हाण हे दोघे जात असताना त्यांचा एकमेकांना धक्का लागला. या किरकोळ कारणातून दोघांमध्ये वाद पेटला. यात अजयच चव्हाण या सराईत गुन्हेगाराला निरंजन याला थेट लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. हा फटका वर्मी बसल्याने निरंजन जागीच कोसळला.

याप्रकरणी अजय चव्हाण यांच्या पोलिसांनी अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!