#VIRAL VIDEO : सेल्फी घेण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राची सोनू निगमला धक्काबुक्की; गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

575 0

चेंबूर : सोमवारी चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या वतीने एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये गायक सोनू निगम देखील उपस्थित होता. यावेळी आपले सादरीकरण झाल्यानंतर स्टेजवरून खाली येते वेळी आमदार पुत्राने सेल्फी घेऊ दिली नाही म्हणून सोनू निगम आणि त्याच्या टीमला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोनू निगम याचा परफॉर्मन्स झाल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाला सोनू सोबत सेल्फी घ्यायचा होता. परंतु सोनू निगम याच्या टीमने त्यास अडवले. या गोष्टीचा राग आल्याने आमदार पुत्र स्वप्निल पातर्पेकर आणि त्याचे कार्यकर्ते भडकले आणि स्टेजवरून उतरत असताना सोनू आणि त्याच्या टीमला धक्काबुक्की करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!