#VIRAL VIDEO : रियल लाईफ सैराट; त्या प्रेमवीरांनी पळून जाऊन लग्न केलं, पण मुलीच्या घरच्यांनी सापडले तिथून फरपटत घरी नेले आणि मग …

1099 0

जयपुर : जयपुरमधून रियल लाईफ सैराट समोर आले आहे. अर्थात सैराट हा चित्रपट ज्या पद्धतीने गाजला होता. तसंच काहीसं कथानक या जोडप्याच आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 10 मार्चला लग्न केलं होतं. आणि त्यानंतर जयपूरच्या हरमदाया भागामध्ये एका भाड्याच्या घरात हे दोघे राहत होते.

मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. या जोडप्याचा पत्ता लागल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी थेट जयपूरच्या त्यांच्या या घरी जाऊन दोघांनाही अक्षरशः फरपटत घरी नेल आहे. तर बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

याप्रकरणी आता पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे. मुलाचे वडील रामलाल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा आणि सुनेच अपहरण झालं असं त्यांनी तक्रारीत म्हटले. तर सुनेच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा आणि सुनेला दुखापत केली असल्याची भीती देखील त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!