#VIRAL VIDEO : तुर्कीमध्ये भूकंपाचा हाहाकार ! कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली आईने दिला बाळाला जन्म; व्हिडिओ होतो आहे व्हायरल…

1408 0

तुर्की : तुर्कीमध्ये भूकंपाने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आत्तापर्यंत पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, 20 हजाराहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर इमारती कोसळल्या असल्याकारणाने मलब्याखालून नागरिकांना बाहेर काढण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सोमवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. यावेळी एक मोठी इमारत जमीनदोस्त झाली. यावेळी बचाव कार्य सुरू असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक बचावकर्मी नवजात बालकाला घेऊन मलब्यातून रस्ता काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या मलब्याखाली एका आईने बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर या बाळाला वाचवण्यासाठीची धडपड सुरू झाली. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक जण हेच म्हणते आहे, “देव तारी त्याला कोण मारी…!”

Share This News
error: Content is protected !!