#VIRAL VIDEO : लखनऊच्या रस्त्यांवर कपलचा फिल्मी स्टाईल रोमान्स; स्कुटीवर तरुणाला अशी मिठी मारून बसली तरुणी, व्हिडिओ होतोय व्हायरल

1087 0

लखनऊ : आजकालच्या तरुणांच्या डोक्यावर फिल्मी भूत बसलेल आहे. खरं आयुष्य आणि फिल्मी आयुष्य यात खूप मोठा फरक असतो ही गोष्ट कदाचित तरुणांना समजावून सांगणं खूप गरजेचं होतं चालले आहे. लखनऊच्या हजरतगंज येथील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतं आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तरुण आणि तरुणी एका स्कुटी वरून जात आहेत. खरंतर अशा वेळी तरुणीने हेल्मेट घालून वाहन चालवणाऱ्याच्या मागे बसायला हवं, पण तरुणी या तरुणाच्या पुढे मांडीवर जाऊन बसलेली आहे हे दिसून येत आहे. एवढंच नाही तर गाडी चालवत असताना देखील या दोघांचा रोमान्स काही थांबलेला नाही.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पोलीस यावर काय कारवाई करणार असे सवाल उठवले जात आहेत. याबाबत लखनऊ सेंट्रल झोनच्या डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, या जोडप्याचा शोध घेण्यासाठी दोन पथक तैनात करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही शोध घेत आहोत. मोटार वाहन कायद्यासोबतच अश्लीलता पसरणाऱ्या बाबत कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!