VIRAL Video : महिलेला अश्लील शिवीगाळ करून दमदाटी करणे पडले महागात ; श्रीकांत त्यागी गजाआड

407 0

Shrikant Tyachi Case : काही दिवसांपूर्वी श्रीकांत त्यागी याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बेकायदेशीर बांधकामावरून एक महिला श्रीकांत त्यागी याला जाब विचारत होती . या दोघांमध्ये शाब्दिक वादविवाद होत असताना श्रीकांत त्यागी याने महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की ,या महिलेला धक्काबुक्की करण्याचा देखील प्रयत्न श्रीकांत त्यागी यांनी केला होता .या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर एक संतापाची लाट उठली होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी त्यागीचा शोध सुरू होता . दरम्यान त्यागीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 25 हजार रुपयांच बक्षीस देखील जाहीर केलं होतं. या संपूर्ण प्रकरणांमध्ये स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील लक्ष घातलं होतं, आणि गृह विभागाला चौकशीचे निर्देशही दिले होते.

दरम्यान नोएडा पोलीस आणि एसटीएफ श्रीकांत त्यागीला अटक करण्यासाठी 8 पथक त्यागीच्या मागावर होती. तीन राज्यांमध्ये त्यागीचा शोध घेतला जात होता. अखेर मेरठच्या कंकर खेळामधून त्यागीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यागीला पोलीस संरक्षणाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील दोषाची पडताळणी करून कारवाई केली जाणार असल्याचे समजत आहे.

Share This News
error: Content is protected !!