#VIRAL VIDEO : लव्ह ट्रायंगल मधून मुलींच्या टोळक्यानी तरुणीला बेदम तुडवले; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

1246 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मधील गोरखपुरमध्ये तरुणींची टोळक्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. नक्की या तरुणींच्या टोळक्यानी एका तरुणीला का मारहाण केली हे समजू शकले नाही. परंतु लव्ह ट्रायंगल मधून ही मारहाण झाली असल्याचं बोललं जातं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तीन ते चार तरुणी एका तरुणीला केसाला धरून मारहाण करत आहेत. तर काठीने देखील या तरुणीला मारहाण केली असल्याच समजते आहे. दरम्यान एका हॉटेलमधला हा व्हिडिओ लक्षात येत असून हॉटेलमधील सुरक्षारक्षकाच्या मध्यस्थी नंतर हा वाद शांत झाला.

सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या याच व्हिडिओच्या मदतीने संबंधित आरोपी तरुणींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!