Bribe Viral News

Bribe Viral News : मला पास करा.. पेपर अवघड गेला आहे असे म्हणत चक्क विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत ठेवल्या 200 आणि 500 ​​च्या नोटा

892 0

देशात लाच घेणे (Bribe Viral News) व लाच देणे हे काही नवीन नाही या साठी (Bribe Viral News) लोक वेगवेगळी शक्कल लढवत असतात. लोक आपलं काम लवकर करून घेण्यासाठी अगदी आरामात लाच देतात. आणि त्या बद्दल अभिमान बाळगतात जणू त्याने फार मोठा पराक्रम केला आहे. सरकारच्या एवढ्या कारवाई नंतरसुद्धा लोक लपवून छपूण हे सर्व काम करत असतात.

या कामात मोठे माणसे सोडा लहानमूल, तरुण सुद्धा या मध्ये मागे नाहीत. आता तुम्ही म्हणाल की लहानमूल कशी लाच देऊ शकतात? मग ही पोस्ट पहाच कारण ‘ सर मला पास करा’ असं लिहत चक्क उत्तरपत्रिकेत 200 आणि 500 च्या नोटा ठेवल्या एका शाळकरी मुलानं त्याच्या उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येत नसल्यानं चक्क पैसे ठेवले आहेत.

कोणत्या मुलाला बोर्डाच्या परीक्षेची भीती नसते. प्रत्येक मुलाला बोर्डाच्या परीक्षेची भीती वाटते. काही मुले त्यांची भीती कमी करण्यासाठी कठोर अभ्यास करतात. तर काही मुलं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच एका आयपीएस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत 100,200 आणि 500 ​​च्या काही नोटा दिसत आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, या नोटा एका मुलाने बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत लाच म्हणून ठेवल्या होत्या, जेणेकरून शिक्षक लालसेपोटी त्याला पास करतील. “पेपर अवघड गेला सर, मला पास करा” असा मथळा लिहत या मुलानं काही पैसे उत्तर पत्रिकेत ठेवले.

हा फोटो आयपीएस अधिकारी अरुण बोथरा (@arunbothra) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. बोथरा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक व्यवस्था.’ मुलांनी शिक्षकाला लाच देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आली आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!