ओझर येथील विघ्नहर उद्यानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

291 0

 

पुणे:- विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात आलेल्या विघ्नहर उद्यानाचे उद्घाटन  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

श्री विघ्नहर मंदिरालगत या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर शहराचे माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, ओझर गावच्या सरपंच मथुरा कवडे,ओझर नं-२ च्या सरपंच तारामती कर्डक, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे ,उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे आदी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टने निर्माण केलेले आणि त्यात एकवीस पत्री गणेशाच्या प्रिय वनस्पतीची लागवड असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव उद्यान असेल असा उल्लेख करून मंत्री  सामंत यांनी भाविकांच्या सुख सोईसाठी निर्माण केलेल्या सर्व सुविधांचे विशेष कौतुक केले.

Share This News
error: Content is protected !!