यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

171 0

आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे आज १९ दुपारी १२.३० वा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते होत आहे.

रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला खासदार ॲड.वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता  चाकणकर यांनी ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाला, वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करणे, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून देणे, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करण्याबाबतही सूचित करण्यात आले होते.

या तीनही जिल्ह्याच्या प्रशासनाने ‘आरोग्यवारी’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिला वारकऱ्यांसाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. आरोग्य आणि सुरक्षाबाबतीतच्या या महत्वाच्या सुविधा महिला वारकऱ्यांच्या उपलब्ध करून दिल्याने पुरोगामी महाराष्ट्रात महिला आरोग्य विषयक जागृतीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे, असे मत  चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.

Share This News

Related Post

Pune Fire

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Posted by - May 18, 2024 0
पुणे : आज पहाटेच्या सुमारास खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग (Pune Fire) लागल्याची वर्दी नियंत्रण कक्षात मिळताच येरवडा अग्निशमन…

इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र धक्के; 400 हून अधिक जखमी; 70 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Posted by - November 21, 2022 0
इंडोनेशिया : सोमवारी इंडोनेशियामध्ये भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे हाहाकार उडाला आहे.५.६ रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने अनेक भागांमध्ये इमारती अक्षरशः हलू लागल्या…

गायक स्वप्नील बांदोडकर यांचं “सांग प्रिये” रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - March 17, 2022 0
गालावर खळी, राधा ही बावरी अशी उत्तमोत्तम गाणी गायलेल्या गायक स्वप्नील बांदोडकरनं आता ‘सांग प्रिये’ या नव्या म्युझिक अल्बमसाठी आवाज…

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 2, 2022 0
मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या…
Amravati Crime

Amravati Crime : अमरावती हादरले !पतीने ओलांडल्या सर्व मर्यादा; पत्नीला गॅसवर ठेवलं अन्..

Posted by - February 18, 2024 0
अमरावती : पती – पत्नी म्हंटले कि भांड्याला भांड लागणार. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघांमध्ये मतभेद होताना (Amravati Crime) दिसतात.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *