#VIDEO : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा ! भाविकांची गर्दी

627 0

Edited By : Bageshree Parnekar : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षानिमित्त आज राज्यातील सगळी मंदिरं सुद्धा सजली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरातही पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

पहाटे चरणतीर्थ पूजेनंतर देवीचे मुख्य पुजारी महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिर शिखरावर गुलाबी साडीची गुढी उभारून विधीवत पुजा करण्यात आली. आणि जयघोषात मराठी नवीन वर्षाच स्वागत केल. तुळजाभवानी मातेची अलंकार पूजा केल्यामुळे मातेच रूप सुंदर दिसत होते. नववर्षाच्या प्रारंभी मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे तर आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळले आहे.

Share This News
error: Content is protected !!