पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच पुण्यातून थेट या शहरासाठी सुटणार वंदे भारत एक्स्प्रेस

4565 0

वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

पुणेकर वंदे भारत एक्स्प्रेसच्या आनंद घेतात मात्र ही ट्रेन मुंबई ते सोलापूर दरम्यान धावत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन सरळ कोणत्याही शहरात जात नाही. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. लवकरच पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाणार आहे. पुणे शहर थेट हैदराबादला वंदे भारत एक्सप्रेसने जोडले जाणार आहे.

वंदे भारत ट्रेनमध्ये काय आहेत सुविधा

– प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
– जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
– लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
– मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
– अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा

या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी

Share This News
error: Content is protected !!