पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा

1017 0

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

आज सकाळी १० वाजता GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले. येथील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे. भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी करण्यात येतोय. आता भाजप नेत्या आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!