युजरने अभिषेक बच्चनला म्हटले बेरोजगार; बहिण श्वेता म्हणाली, ‘अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं पटत नाही’!

411 0

मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन याला आजपर्यंत नेहमीच त्याच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीमुळे ट्रोल करण्यात आले आहे. वडील अमिताभ बच्चन यांची आत्तापर्यंतची घोडदौड पाहता अभिषेक मात्र त्या मानाने चांगले यश बॉलीवूडमध्ये मिळवू शकला नाहीये. नुकताच सोशल मीडियावरून देखील अभिषेकला ट्रोल करण्यात आले.

तर झालं असा कि, एका पत्रकाराने जाहिरातींनी भरलेल्या वर्तमानपत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यावर अभिषेकने तुम्ही आत्ता सुद्धा वर्तमानपत्र वाचता? असा प्रतिप्रश्न केला. नेमका याच अभिषेकच्या प्रश्नावर एका युजरने अभिषेकला चांगलेच ट्रोल केले आहे. या युजरने अभिषेकच्या ट्विटला रिट्वीट करून म्हटले आहे की, बुद्धिमान लोक वाचतात तुमच्यासारखे बेरोजगार नाही. यावर अभिषेकने दिलेल्या उत्तरानंतर मात्र या युजरला अभिषेकची माफी मागावी लागली आहे.

अभिषेकने त्यास उत्तर दिले की, “ओहं हा… उत्तरासाठी धन्यवाद! पण बुद्धिमान आणि बेरोजगार या दोन्हीही गोष्टींचा संबंध नाही. तुम्ही स्वतःकडेच पहा. मी हे खात्रीने सांगू शकतो की, तुमच्याकडे नोकरी असेल पण त्याच सोबत तुम्ही बुद्धिमान नाहीत. हे तुमच्या ट्विट वरून मी बोलू शकतो. त्यानंतर या युजरने अभिषेकची माफी मागितली.

याच विषयी बोलताना अभिषेकची बहिण श्वेता बच्चन हिने या संवादा विषयी संताप व्यक्त केला. माझं रक्त खवळत! अशा शब्दात प्रतिक्रिया देऊन श्वेता म्हणाली की, अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं पटत नाही.

Share This News
error: Content is protected !!