पैसे उकळण्यासाठी सायबर हॅकरकडून चक्क पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर !

249 0

पिंपरी-चिंचवड : एका सायबर हॅकरनं काही पोलीस अधिकाऱ्यांकडून बेकायदा पैसे उकळण्यासाठी चक्क पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा नावाचा वापर केल्यानं एकच खळबळ उडालीये.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावानं सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून त्या माध्यमातून त्यांच्याच पोलीस अधिकाऱ्यांकडं गिफ्ट कार्डसाठी पैसे मागणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या या फेक अकाउंटमध्ये पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो वापरून एक मोबाईल नंबर देण्यात आला आज त्या नंबरवरून पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यामधील काही पोलीस निरीक्षकांना गिफ्ट कार्डसाठी पैसे मागितले.

पोलीस आयुक्तांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या या फेक अकाउंटवरील मोबाइल नंबर हा तामिळनाडूतील संजय कुमार या व्यक्तीच्या नावे दाखवत आहे. चिंचवड पोलीस आणि सायबर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!