दारू नाही, ड्रग्स नाही…नशा करण्यासाठी कॉन्डोमचा वापर ! पश्चिम बंगालमधील तरुणांचा विक्षिप्त प्रकार उघडकीस

596 0

पश्चिम बंगाल : आज पर्यंत नशा करण्यासाठी दारू, सिगारेट, ड्रग्स अशा अमली पदार्थांचा वापर होत होता. सामान्य माणसाला तरी हेच माहीत होते. पण नक्कीच हे ऐकून धक्का बसेल की नशा करण्यासाठी काही तरुण कॉन्डोमचा वापर करत आहेत. हो.. तुम्ही बरोबर ऐकत आहात ! हा प्रकार उघडकीस आला आहे तो पश्चिम बंगाल मधून…

पश्चिम बंगाल मधल्या दुर्गापुरमध्ये अचानक काही दिवसांपासून तरुण आणि विद्यार्थ्यांनी कॉन्डोम खरेदी करण्याचे सुरू केले. हे प्रमाण सामान्य नव्हते तेथील स्थानिक मेडिकल चालवणाऱ्यांना देखील शंका वाटली. या तरुणांचा कॉन्डोम खरेदी करण्याच प्रमाण इतकं वाढलं होतं की, अगदी कॉन्डोमचा दुकानांमध्ये तुटवडा भासू लागला. मग हे तरुण या कॉन्डोम्स नक्की करतात तरी काय असा संशय या मेडिकल चालकांना आला आणि यातूनच जी माहिती मिळाली ती अगदीच धक्कादायक होती.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने याविषयी एक संशोधन केल्यानंतर माहिती समोर आली की ही मुलं या कॉन्डोमचा उपयोग नशा करण्यासाठी करत होते. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की, कॉन्डोमचा उपयोग नक्की नशा करण्यासाठी ही मुलं कशी करत असतील.

तर या कॉन्डोममध्ये ॲरोमॅटिक कंपाउंड असतात. हे कॉन्डोम्स गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले असता यातून अल्कोहोल रिलीज होते. याच पाण्याची वाफ घेणे आणि त्यातून नशा करण्याचा प्रताप हे तरुण करत होते. तर काहीजण या पाण्याचा दारू सारखा पिण्यासाठी देखील वापर करत होते.

Share This News
error: Content is protected !!