अभिनेत्री ऊर्वशी रौतेलाने केक कापताच आग भडकली, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

1238 0

उर्वशी रौतेला म्हणजे बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. उर्वशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. उर्वशी रौतेला नुकतीच जयपूरला आली होती. उर्वशीच्या बाबतीत अशीच एक घटना घडली आहे. ज्यामुळे उर्वशी भीतीने थरथर कापू लागली.

ऊर्वशी रौतेला नुकतीच एका फॅशन आणि ग्लॅमर अकादमीच्या लॉन्चसाठी उर्वशी जयपूरला आली होती. उर्वशी येणार म्हटल्यावर तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. यावेळी उर्वशीने तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतला. पोझ दिल्या. उर्वशीने तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतला. पोझ दिल्या. सोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. पण तरीही उर्वशीने त्यांना निराश केलं नाही.

त्यानंतर उर्वशी सर्वांसोबत केक कापत असताना एक धक्कादायक घटना घडली. तिच्या भोवती चाहत्यांचा गराडा पडला होता. त्यावेळी मेणबत्ती लावत असताना आग भडकली. बाजूलाच असलेल्या एका मुलीच्या चेहऱ्यापर्यंत ही आगीची झळ गेली. त्यामुळे या तरुणीचे केस जळाले. नशीब बलवत्तर म्हणून तिचा चेहरा भाजला नाही. तिच्या कपड्यानेही पेट घेतला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या तरुणीचे केस जळाल्याने ऊर्वशीही घाबरली. या तरुणीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या तरुणीला रुग्णालयात नेल्यानंतर ऊर्वशीने तिला फोन केला. तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

ऊर्वशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऊर्वशी 365 डेजचे स्टार Michele Morrone यांच्यासोबत दिसणार आहे. या शिवाय इन्स्पेक्टर अविनाश या सिनेमात ती रणदीप हुडा सोबत काम करणार आहे. ब्लॅक रोज या सिनेमातही ती काम करणार आहे. साऊथच्या Thiruttu Payale 2 च्या हिंदी रिमेकमध्येही ती दिसणार आहे. तिच्या या सिनेमाची तिचे चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत.

उर्वशीचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबत जोडलं जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अद्याप दोघांमध्ये मैत्री आहे की रिलेशनशीप यावर या दोघांनीही भाष्य केलेलं नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!