“उर्फी म्हणे मी एलर्जीमुळे कपडे घालत नाही… !” चित्रा वाघ म्हणतात, तुझ्या सगळ्या एलर्जीवर….

256 0

पुणे : सध्या उर्फी आणि चित्रा वाघ वॉर सुरू आहे. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवरून चित्रा वाघ उर्फीवर प्रचंड चिडल्या आहेत. यावर उर्फी जावेद ने आता एक व्हिडिओ पोस्ट करून ती कपडे का घालत नाही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिच्या पायावर पुरळ आल्याचं दिसून येत आहे. कपडे घालण्याची ऍलर्जी असल्याकारणाने ती कपडे घालत नाही असं तिने सांगितलं.

यावर आता चित्रा वाघ यांनी तिला चांगलं फटकारल आहे. आम्ही तुझ्या सगळ्या एलर्जीवर उपचार करू असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्या म्हणाल्या की, “व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही, फॅशन आणि नग्नता यात अंतर आहे. ऐकलं तर ठीक नाहीतर आम्ही सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्याचबरोबर ती नागडी उघडी फिरते तिच्यावर कारवाई होत नाही. मात्र मला नोटीस पाठवली गेली अशी टीका त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.

Share This News
error: Content is protected !!