राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन

227 0

पुणे : भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय एकता आणि स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संदेश देण्यासाठी तसेच समाजात अखंडता आणि सुरक्षितता टिकविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्याचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता शनिवार वाडा येथून दौडचा प्रारंभ होऊन आप्पा बळवंत चौक – श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदीर मार्गे शनिवार वाडा येथे समारोप झाला.

यावेळी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहरच्या तहसिलदार राधिका हावळ-बारटक्के, पुणे शहर तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय एकता दौडमध्ये शिवाजी मराठा विद्यालय, आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!