राजस्थान : राजस्थानच्या शिरोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. राजस्थान मधील सिरोही जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील कुत्र्यांनी अवघ्या एक महिन्याच्या बाळाला चावा घेऊन मृत्युमुखी पाडले आह.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात आईसोबत नवजात शिशु झोपलेला होता. यावेळी गार्ड दुसऱ्या वार्डमध्ये काम करत होता. तर परिचारकाला झोप लागली होती. बाळाच्या आईला देखील झोप लागली होती. याचाच फायदा घेऊन कुत्र्यांनी या एक महिन्याच्या बाळाला रुग्णालयाच्या बाहेर फरपटत नेले. या घटनेमध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली यातूनच या गोष्टीचा उलगडा झाला आहे. माहिती कळाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.