मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोन गंभीर जखमी

412 0

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर रात्री १२च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत. तर दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिली. या गाडीमध्ये सात प्रवासी होते. ही धडक एवढी भीषण होती की पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. दोघांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवी म्हणजे या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले होते.

Share This News
error: Content is protected !!