दुर्दैवी : मुसळधार पावसामुळे पुण्यात झाड पडून एका रिक्षा चालकाचा मृत्यू

334 0

पुणे : चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना घडल्या आहेत. पुण्यातील रामनगर भागात एका रिक्षा वर मोठे झाड पडले. यामध्ये रिक्षाचालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला . चारच्या सुमारास पुण्यामध्ये जवळपास सर्वच भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी अग्नीशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने झाड बाजूला केले .

Share This News
error: Content is protected !!