अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक

391 0

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य रियाझ भाटी याला पोलिसांनी एका खंडणी प्रकरणात अटक केली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंग आणि सचिव वाजे यांच्यावर गोरेगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात रियाझ भाटी हाही सहआरोपी आहे.आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाजेच्या सांगण्यावरून रियाझ बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळत असे असा आरोप आहे. या प्रकरणी रियाजचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द झाल्यानंतर तो लपून बसला होता.रियाझ भाटी आणि छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याने एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यासोबतच त्याच्याकडून महागड्या कार आणि सात लाखांपेक्षा जास्त पैसे उकळले होते. या संपूर्ण घटनांनंतर अंधेरीतील व्यावसायिकाने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!