युके कोर्टाने निरव मोदीची याचिका फेटाळली; उच्च न्यायालयाने निरव मोदीला भारताकडे सोपवण्याचे दिले आदेश

288 0

नवी दिल्ली : युके कोर्टाने निरव मोदीची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने निरव मोदी याला भारताकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष पीएमएलए कोर्टाने डिसेंबर 2019 मध्ये आर्थिक फसवणूक कायदा 2018 नुसार निरव मोदीला फरारी घोषित केले होते.

तब्बल ७००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप निरव मोदीवर आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर निरव मोदी यांनी भारतातून काढता पाय घेतला. सध्या लंडनमधील तुरुंगात असणाऱ्या निरव मोदी याला भारताकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!