Aadhar

Aadhar Update : आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

2785 0

भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून (Aadhar Update) आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत 14 सप्टेंबरपर्यंत होती. आता 14 डिसेंबरपर्यंत नागरिकांना कोणतंही शुल्क न भरता आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

UIDAI नं या संदर्भात निवदेन प्रसिद्ध केलं आहे. myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड करून आधारमधील माहिती विनामूल्य अद्ययावत करता येते. या दुरुस्ती व बदलासाठी 14 सप्टेंबर 2023 ची मुदत देण्यात आली होती. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळं ही सुविधा आणखी 3 महिन्यांनी म्हणजेच, 15 सप्टेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. https://myadhaar.uidai.gov.in/ या पोर्टलवर 14 डिसेंबर पर्यंत ही सुविधा विनामूल्य उपलब्ध असणार आहे.

माय आधार पोर्टलमार्फत कसं कराल अपडेट?
https://myaadhaar.uidai.gov.in/ पर लॉगइन कराल.
लॉगइन केल्यानंतर ‘नाव/लिंग/जन्मतारीख आणि पत्ता अपडेट’ ऑप्शनवर क्लिक करा.
जर आधार कार्डावरील पत्ता अपडेट करायचा असेल, तर Update Address पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाकून पुढा जा.
डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमच्यासमोर तुमचे आधार डिटेल्स दिसतील.
स्क्रिनवर दिसणारे डिटेल्स चेक करुन व्हेरिफाय करा आणि पुढे जा.
त्यानंतर तुम्हाला अ‍ॅड्रेस प्रूफसाठी अ‍ॅड्रेस प्रूफची कॉपी अपलोड करा.
आता आधार अपडेट झाल्यानंतर 14 नंबर्स असलेला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट होईल.
या नंबर मार्फत तुम्ही तुमच्या आधारमध्ये केलेले बदल ट्रॅक करु शकता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!