Breaking News

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड अडीच तास चर्चा; ठाकरे गटासोबतच्या युतीवर…

489 0

मुंबई : काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अडीच तास बंद दाराआड प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरू होती.

या चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती करू नये असा आग्रह मुख्यमंत्री यांनी आंबेडकरांना केला असल्याची माहिती समोर येते आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना वंचित गटाचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत यांना म्हटले आहे की, इंदू मिल स्मारक अहवालाच्या संदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.

या अहवालावर यावेळी चर्चा झाली असून ज्या पक्षासोबत भाजप आहे त्यासोबत आम्ही जाणार नाही. हि आमची भूमिका आम्ही कधीच जाहीर केली होती. भाजपसोबत शिंदे सत्तेत असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. त्यामुळे शिंदे गटासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असे यावेळी सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.

तर यापूर्वी देखील 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत आले तर राज्यातील इतरही दलित नेते सोबत येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!