तू झूठी मैं मक्कार ट्रेलर रिलीज : श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ऑन स्क्रिन रोमान्स; चाहत्यांमध्ये उत्सुकता , तुम्ही टेलर पाहिलात का ?

1162 0

तू झूठी मैं मक्कर ट्रेलर रिलीज : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर त्यांच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार ‘ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. हा चित्रपट आधीच त्याच्या शीर्षकामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांच्या उत्सुकतेदरम्यान सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

https://youtu.be/1UTFJ4nE-0k

तू झूठी मैं मक्कर’चा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा टायटल प्रोमो रिलीज केला होता, हा प्रोमो चांगलाच आवडला होता. प्रोमो आल्यापासून प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही समोर आला आहे.

आधुनिक काळातील प्रेमकहाणी दाखवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक लव रंजन यांनी ‘तू झूठी मैं मक्कर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी टी-सीरिज आणि लव्ह फिल्म्सने घेतली आहे. होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तू झूठी मैं मक्कर यावर्षी ८ मार्च ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणबीर आणि श्रद्धा व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि आयेशा रझा मिश्रा देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी देखील या चित्रपटाचा भाग आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!