Edited By : Sanket Deshpande : शरद पवार देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असलेला नाव शरद पवार आणि निवडणुका हे जणू एक समीकरण निवडणुका जिंकण्यात हातखंडा असलेल्या शरद पवारांनाच एका एका निवडणुकीत पराभूत व्हावं लागलं होतं नेमकं काय आहे हा किस्सा पाहूयात TOP POLITICAL किस्सेमध्ये…
1996 ला काँग्रेसमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली.. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याची परिस्थिती निर्माण झाली. याच साली पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजपला 161 तर काँग्रेसला 140 जागा मिळाल्या. यानंतर 1997 मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात येण्याची आणि काँग्रेसचा प्रचार करण्याची घोषणा केली. नरसिंह राव यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असणार? याची उत्सुकता लागली होती.
यावेळीच सीताराम केसरी यांनी काँग्रेसचा अध्यक्ष होण्यासाठी स्वतःचा अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात होते शरद पवार आणि राजेश पायलट.. सीताराम केसरींना टक्कर देण्यासाठी शरद पवार आणि राजेश पायलट हे देशभरात फिरले.. वादळी चर्चा झालेल्या या निवडणुकीत केसरी यांना 6 हजार 224, पवारांना 882 आणि राजेश पायलट यांना 354 मते मिळाली.