TOP NEWS मराठीचा ‘स्पेशल रिपोर्ट’ : राज्यपालांना पदावरून हटवणं शक्य आहे का ? जाणून घ्या राज्यपालांना हटवण्याची प्रक्रिया

297 0

TOP NEWS मराठीचा ‘स्पेशल रिपोर्ट’ : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्यपालांना पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला आहे मात्र राज्यपालांना पदावरून हटवणे शक्य आहे का आणि राज्यपालांना पदावरून कोण हटवू शकतं हेच जाणून घेणारा TOP NEWS मराठीचा ‘स्पेशल रिपोर्ट’

राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटक राज्याचं काम पाहतो.

आता राज्यपाल पदासाठीची पात्रता नेमकी काय आहे ते पाहुयात

ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.

त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

ती व्यक्ती राज्यातील किंवा देशातील

कोणत्याही सभागृहाचे म्हणजे राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा यांचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती यापैकी कोणत्याही सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपालपद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो

आता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा राहिला की राज्यपालांना पदावरून कोण दूर शकतो तर याच उत्तर आहे राष्ट्रपती
राज्यपालांची नेमणूक केवळ राष्ट्रपती करू शकतात. तसंच त्यांना हटवण्याबाबतचा निर्णय सुद्धा केवळ राष्ट्रपतींच्या हातात असतो राज्यपालांना हटवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणालाही कोर्टातही दाद मागता येत नाही. कारण निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो. फार फार तर राष्ट्रपतींकडे त्यासाठी विनंती अर्ज पाठवता येऊ शकतो.

राज्यपालांच्या नेमणुकीचे किंवा त्यांना काढण्याचे कुठलेही नियम नाहीत. अगदी पोलीस कॉन्सटेबल किंवा कोणतंही पद भरण्यासाठी प्रक्रिया असते पण राज्यपाल या पदाबाबत अशी कुठलीच ठोस प्रक्रिया नाही. त्यांना काढायचे असल्यास त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं जाऊ शकतं

एकंदरीत काय तर राज्यपालांना नियुक्त करणं आणि त्यांना पदावरून पायउतार करणं केवळ आणि केवळ राष्ट्रपतीच्या हातात असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल वाढणारा वाढता रोष पाहून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आता काय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!