TOP NEWS MARATHI LIVE : पुण्यात एक होता चांदणी चौक पूल! चांदणी चौक पूल काही वेळांत पडणार पाहा थेट दृश्य

592 0

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः त्रासला होता.  गणेशोत्सव काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले असताना ते देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकले. पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे या वाहतुकीच्या कोंडीवर काहीतरी तातडीने मार्ग काढावा अशी मागणी केली, आणि चांदणी चौकाचा श्वास मोकळा होण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या.  22 सप्टेंबर रोजी चांदणी चौकातील पूल पाडण्याचे आधी ठरवण्यात आले होते. दरम्यान आज अर्थात दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान स्फोटके लावून हा ब्रिज पाडण्यात येणार आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील काल हवाई मार्गे नियोजनाचा आढावा घेतला. हा पूल हटवल्यानंतर आता नव्या उड्डाणपूलाचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे. चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी येथे नऊ पदरी पूल बांधण्यात येणार आहे.

TOP NEWS MARATHI : असा असेल चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल; त्याची खास दृश्यं TOP NEWS मराठीच्या हाती

दरम्यान ब्रिज पाडण्यासाठीचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आला आहे. रात्रीते उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी हा पाडताना पाहण्यासाठी गर्दी करू नये ,यासाठी मोठा पोलिसांचा पाऊस फाटा या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे. त्यासह 144 कलम देखील लागू करण्यात आला आहे. आता हा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य झाला असल्याची खात्री केल्यानंतर बारा ते दोन या वेळेत हा पूल केव्हाही पाडला जाईल याची थेट दृश्य आपण पाहू शकता टॉप न्यूज मराठीवर…

Share This News
error: Content is protected !!