#TOLL TAX : देशातील कोणत्याही मार्गावरून जात असताना ‘या’ वाहनांना द्यावा लागत नाही टोल टॅक्स

675 0

एक्सप्रेस वे म्हटलं की टॅक्स हा भरावा लागणारच. एक्सप्रेस तयार झाल्यानंतर वाहन कुठले आहे, किती मोठे आहे यानुसार टॅक्स ठरवला जातो. पण तुम्हाला माहित आहे का ? की असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. देशात काही गाड्या अशा आहेत की ज्यांना कोणत्याही मार्गावर टोल टॅक्स द्यावाच लागत नाही. परिवहन मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार जवळपास 25 वाहने अशी आहे तर ज्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही. तर मग कोणते आहेत या गाड्या पाहूया…

भारतात अशी अनेक वाहने आहेत ज्यांना टोल भरण्याची आवश्यकता नाही. यात भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, कुठल्याही राज्याचे राज्यपाल, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशातील लेफ्टनंट गव्हर्नर, पूर्ण सामान्य अथवा समकक्ष दर्जाचे चीफ ऑफ स्टाफ, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संसद सदस्य, लष्करप्रमुखांचे लष्करी कमांडर आणि इतर सेवांमधील समकक्ष, राज्य सरकारचे मुख्य सचिव, भारत सरकारचे सचिव, सचिव, राज्यांची परिषद, लोकसभा, सचिवांच्या वाहनांचा समावेश आहे.

निमलष्करी दल आणि पोलीसांसह वर्दीतील केंद्रीय आणि राज्यातील सशस्त्रदल, कार्यकारी दंडाधिकारी, अग्निशामक विभाग, शव घेऊन जाणारी वाहने यांनाही टोल टॅक्स द्यावा लागत नाही. याशिवाय, राजकीय दौऱ्यावर आलेल्या परदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, एखाद्या राज्यातील विधानसभेचा सदस्य, तसेच एखाद्या राज्यातील विधानपरिषदेच्या सदस्याने संबंधित विधीमंडळाने दिलेले ओळखपत्र दाखवल्यास, त्यालाही टोल टॅक्स द्यावा लागत नाही.

 

Share This News
error: Content is protected !!