आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस ; शिंदे गटाच्या 16 आमदारांचे भवितव्य ठरणार

433 0

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे. ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या भवितव्याबाबत आज निर्णय होतो आहे. दरम्यान शिवसेनेचे मोठे नेते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. अनिल देसाई ,सुभाष देसाई ,अरविंद सावंत हे सुनावणीसाठी दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत.

महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टातील आजची घटना पिठासमोर होणारी खटल्याची सुनावणी ही संपूर्ण देशाच्या जनतेला लाईव्ह पाहता येणार आहे. आजच्या महत्त्वाच्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील खटल्यासह ,EWS आरक्षण, दिल्ली केंद्र सरकार वाद यासारखे मोठे खटले देखील थेट पाहता येणार आहेत .

यासाठी webcast.gov.in/scindia/ या लिंकवर जाऊन तुम्हाला ही थेट सुनावणी पाहता येणार आहे. आजच्या दिवसापासूनच सुप्रीम कोर्टाने ही नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!