“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला…!” ; उद्धव ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया

720 0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यावर आता सर्वच स्तरातून मतप्रदर्शन केले जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडेतोड शब्दात टीका केली आहे.

ते म्हणाले कि, चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल..”

Share This News
error: Content is protected !!