थरारक : एकाच पिंजऱ्यात महिला आणि बिबट्या 30 फूट खोल विहीरीमध्ये ! महिलेची हिम्मत पहाच…

872 0

मंगळूरू : जंगली प्राणी समोर पाहणे आणि तेही पिंजरा नसताना … हा विचार सुद्धा मनात एक काळजाचा उडवतो ! बिबट्या, चित्ता, वाघ, सिंह आणि असे अनेक प्राणी ज्यांना पाहूनच घाबरगुंडी उडते , अशा एका प्राण्याबरोबर ३० फूट खोल विहिरीत आणि तेही एकाच पिंजऱ्यात महिला … वाचून आश्चर्य वाटतंय ना !

तर मग झालं असं की, 31 वर्षीय वन्यजीव पशु डॉक्टर मेघना पेमय्या यांची मंगळूरूपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कठील गावातील निडोडीजवळ एक घटना घडली. एक बिबट्या विहिरीत पडला होता. या बिबट्याला वाचवण्याची मोहीम सुरू होती. यावेळी सुदैवानं डार्ट मारताना बिबट्या योग्य पद्धतीने बसला होता , त्यामुळे त्याला बेशुद्ध करणे काहीस सोपं गेलं. बिबट्या माझ्यासोबत पिंजऱ्यात होता. त्यावेळी मनात असलेली भावना व्यक्त करू शकत नाही. असे यावेळी त्या म्हणाल्या…

#SATARA : सातवीत शिकणारी मुलगी होती चार महिन्यांची गरोदर ; नववीत शिकणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, इंस्टाग्रामवरची मैत्री चांगलीच भोवली

त्यांची ही हिंमत खरंच कौतुक करण्यासारखी आहे. या बिबट्याची सुटका तर त्यांनी केलीच, तशीच आतापर्यंत त्यांनी 50 बिबट्यांची सुटका केली आहे. डॉक्टर मेघना या बेंगळुरू येथील वन्यजीव औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून डॉक्टर यशस्वी नरवी यांच्यासोबत चित्तेपिल्ली संशोधन आणि बचाव केंद्रात सहा वर्षांपासून त्या काम करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!