पुण्यात थरार : ” तू जर व्याजाचे पैसे दिले नाही, तर आम्ही तुझे हात कापू ! गजा मारणे टोळीतील पप्पू कुडलेने कोणाला दिली धमकी, वाचा काय आहे प्रकरण..

50464 0

पुणे : पुण्यातील येरवडा चौकात गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले यानं व्याजाचे पैसे दिले नाहीत तर तुझे हात कापू अशी धमकी एकास दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या चौकामध्येच संबंधित व्यक्तीला मारहाण देखील करण्यात आली. आणि त्याच्या खिशातून 82 हजार रुपये देखील काढून घेण्यात आले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना पाच जानेवारीला पुण्यातील गुंजन चौकामध्ये घडली आहे. फिर्यादी हे एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहामध्ये असताना ओळखीतून एक गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर 21 लाख रुपये या संबंधित व्यक्तीने परत देखील केले. पण अजून वीस लाख रुपयांचा व्याज दे असा तगादा कुडले यान लावला होता.

दरम्यान या प्रकरणी सांगवीतील एका 38 वर्षीय तरुणांन येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल उर्फ पप्पू कुडले, बालाजी उर्फ भैय्या कदम या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पाच जानेवारीला येरवड्यातील गुंजन चौकामध्ये या दोघांनी फिर्यादीस धमकी दिली आहे.

फिर्यादी आणि त्यांचे मित्र गाडीतून जात असताना या टोळीने त्यांना गुंजन चौकात अडवलं. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना देखील हाताने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या खिशातील 82 हजार रुपये देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आले. यावेळी मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापूस ही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे का धाव घेतली .

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!